
एअर इंडिया खरेदी करण्यासाठी इच्छुक कंपन्यांना बोली लावण्यासाठी केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे. आता एअर इंडियासाठी 30 एप्रिलपर्यंत बोली लावता येणार आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे ही मुदत वाढविण्यासाची मागणी होत होती. त्यामुळे गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या समितीने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही मुदत 17 मार्चपर्यंत होती. एअर इंडियाचे 100 टक्के भाग विक्री होणार आहेत. त्याचबरोबर एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेडचेही 100 टक्के शेअर्स आणि सिंगापूरची कंपनी एअर इंडिया सॅट्स एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे 50 टक्के शेअर्सची विक्री होणार आहे. एअर इंडियासाठी आता हिंदुस्थानबाहेर राहणारे अनिवासीदेखील 100 टक्के बोली लावू शकतात. यापूर्वी त्यांना केवळ 49 टक्के भागावर बोली लावण्याचा अधिकार होता.

























































