एअर इंडियाच्या विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एअर इंडियाचे दुबईहून कोचीला निघालेले बी-787 बोईंग विमान आज सायंकाळी अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मुंबई विमानतळावर उतरवावे लागले. कमी दबावाची समस्या निर्माण केल्याने हा इमर्जन्सी लँडिंगचा निर्णय घ्यावा लागल्याचे नागरी उड्डाण महासंचालक (डीजीसीए) कार्यालयाकडून सांगण्यात आले. या घटनेप्रकरणी चौकशी केली जाणार असल्याचीही माहिती देण्यात आली.