अजय देवगण वेबसीरिजमध्ये

नवाजुद्दीन सिद्धीकी, अभिषेक बच्चन, सैफ अली खान यांच्यानंतर आता बॉलीवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगण डिजिटल प्लॅटफॉर्मवर एंट्री करण्यासाठी सज्ज झाला आहे. आपल्या मुलीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवारी अजयने आपल्या आगामी वेबसीरिजची घोषणा केली आहे.

‘रुद्र-द एज ऑफ डार्कनेस’ असे या वेबसीरिजचे नाव असून डिस्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. यात तो पोलीस अधिकाऱयाची भूमिका साकारणार आहे. ‘लुथर’ या ब्रिटिश वेबसीरिजचा हा हिंदी रिमेक असणार आहे. लुथरमध्ये इदरीस एल्बान हे मुख्य भूमिकेत होते. तिच भूमिका अजय ‘रुद्र’मध्ये साकारणार आहे. याबाबत अजय म्हणाला, मला नेहमीच वेगळय़ा प्रकारच्या भूमिका साकारायला आवडते. एखादी गोष्ट आवडली तर तिचे सिनेमात कसे रूपांतर होईल याकडे मी लक्ष देतो. या सीरिजनिमित्ताने काहीतरी नवीन करण्याची संधी मिळालीय.

आपली प्रतिक्रिया द्या