न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी हिंदुस्थानी संघ जाहीर, मुंबईकर रहाणेकडे नेतृत्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येत्या 17  नोव्हेंबरपासून टीम इंडिया  न्यूझीलंडशी घरच्या मैदानावर खेळणार आहे. या मालिकेत  उभय  संघ तीन टी-20  आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत. पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे. अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर चेतेश्वर पुजाराला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. विराट कोहली दुसऱया कसोटी सामन्यात संघात सामील होईल आणि कर्णधारपदाची धुरा सांभाळेल.

कर्णधार विराट कोहली आणि हिटमॅन रोहित शर्माला पहिल्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली आहे. रोहित न्यूझीलंडविरुद्धच्या टी 20 लढतीच्या मालिकेत हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व रोहित करीत असल्याने त्याला विश्रांती दिल्याचे समजते. अष्टपैलू हनुमा विहारीसह मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह यांना पहिल्या  कसोटीच्या  संघात  स्थान  देण्यात आलेले नाही. यष्टिरक्षक पंतऐवजी पुन्हा अनुभवी यष्टिरक्षक वृद्धिमान सहाला संघात निवडण्यात आले आहे.  केएस भरत या मालिकेतील दुसरा यष्टिरक्षक असेल. आंध्र प्रदेशचा 28 वर्षीय भरत इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला आहे. या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेसाठी तो पाच स्टँडबाय खेळाडूंपैकी एक होता.

हिंदुस्थानी संघ –

अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जाडेजा, आर. अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि  प्रसिद्ध पृष्ण.

हिंदुस्थान -न्यूझीलंड कसोटी मालिका

पहिली कसोटी –  25 ते 29 नोव्हेंबर 2021 , ग्रीन पार्प, कानपूर, सकाळी 9.30 पासून

दुसरी कसोटी – 3 ते 7 डिसेंबर 2021,  वानखेडे स्टेडियम, मुंबई, सकाळी 9.30 पासून