
विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार जाहीर सभांमध्ये विनोदी वक्तव्य करून वातावरण हलकेफुलके करण्यासाठीही ओळखले जातात. सध्या त्यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. नगर येथील शेतकऱ्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना अजित पवारांनी बुवाबाजीवर विधान केल्याने सभेत खसखस पिकली. योगगुरू रामदेव बाबा यांचे नाव घेत अजित पवारांनी केलेल्या मिश्किल टिप्पणीमुळे उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.
तुम्ही नखाला नख घासता ते रामदेव बाबांनी सांगितले म्हणून करता ना. रामदेव बाबांनी सांगितले नखाला नखं घासा. मी केलं पण माझी सगळी केस गेली. नवीन केस यायची तर बाजुलाच राहिली, असे अजित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी डोक्यावरची गेलेली केसही दाखवली. अजित पवारांची ही कृती पाहून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
ते पुढे म्हणाले की, बुवा लोकांचे अजिबात ऐकू नका. साधू संतांचे ऐका. महापुरुषांचे ऐका. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ, सावित्रीमाई फुले यांनी सांगितलेले विचार ऐका. मौलाना आझाद असतील शाहू-फुले-आंबेडकर असतील किंवा अण्णाभाऊ साठे असतील या सर्व महान लोकांचे ऐका. पण बुवाबाजी करणाऱ्यांचे ऐकू नका. नखाला नख घासून तिसरेच काहीतरी व्हायचे आणि मग डॉक्टरकडे जावे लागेल. डॉक्टर म्हणेल, हे कुणी करायला लावलं. पुन्हा डॉक्टरचा खर्च करावा लागेल.
View this post on Instagram






























































