
राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमावेळी घडलेल्या दुर्दैवी घटनेची निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी करण्याच्या मागणीसह अन्य काही मागण्या केल्या आहेत.
ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याचा सोहळा 16 एप्रिल रोजी खारघर, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान 14 निष्पाप अनुयायांचा मृत्यू झाला. या गंभीर घटनेची निवृत्त न्यायाधिशांकडून चौकशी करावी, अशी मागणी अजित पवार यांनी राज्य सरकारसह राज्यपालांकडे केली आहे.




























































