
सामना ऑनलाईन । मुंबई
दिव्यांग क्रिकेटच्या प्रसारासाठी बहुमूल्य योगदान देणारे हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार ‘पद्मश्री’ अजित वाडेकर यांना आदरांजली वाहण्यासाठी यंदा मुंबई क्रिकेट असोसिएशन फॉर डिसएबल्डने येत्या मंगळवारपासून 29 ते 30 जानेवारी या कालावाधीत शिवाजी पार्क, दादर येथे ‘पद्मश्री’ अजित वाडेकर स्मृतिचषक दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या 29 व्या आंतर मुंबई दिव्यांग क्रिकेट स्पर्धेला सी. एस. इन्फोकॉम व एलआयसी यांचा पुरस्कार लाभला आहे. या स्पर्धेत मुंबईतील दिव्यांगांचे नामवंत क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत. यापूर्वीही मुंबईच्या ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चॅलेंज संस्थेशी संलग्न मुंबईच्या दिव्यांग क्रिकेट संघाने देशभरात अनेक स्पर्धांचे अंजिक्यपद पटकावले आहे. यंदाच्या 29 व्या आंतर मुंबई ‘पद्मश्री’ अजित वाडेकर स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धेला उपस्थित राहून क्रिकेट शौकिनांनी दिव्यांग क्रिकेटपटूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन मुंबई क्रिकेट असोसिएशन फॉर डिसएबल्डचे अध्यक्ष सूर्यकांत लाडे व सचिव विनोद गुप्ता यांनी केले आहे.

























































