‘या’ आजाराने ग्रस्त आहे आलिया भट! म्हणते कधीकधी विनाकारण येतं रडू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट हिने आपल्या छोट्याश्या चित्रपट कारकिर्दीत अनेक सुंदर आणि वैविध्यपूर्ण भूमिका केल्या आहेत. मग तो हाय वे असो किंवा उडता पंजाब, डियर जिंदगी असो वा राझी. तिच्या भूमिकांच्या निवडीमुळे तिने अल्पावधीतच स्वतःचा चाहता वर्ग निर्माण केला आहे. तिला राझी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, आलिया गेला बराच काळ एका आजाराने ग्रस्त आहे. त्यामुळे तिला बऱ्याचदा त्रासही होतो.

त्या आजाराचं नाव एन्झायटी किंवा विस्मरण असं आहे. नुकतीच एका मुलाखतीतून तिने आपल्या आजाराविषयी सांगितलं. मी कधी नैराश्याचा सामना केला नाही. पण मला विस्मरणाचा प्रचंड त्रास आहे. मला विस्मरणाचा झटका येत नाही, पण थोडं उदास वाटत राहतं. त्यामुळे मी कधीकधी उगाचच रडते. मग काही वेळाने सगळं काही पूर्वीसारखंच होतं, असं आलिया या मुलाखतीत म्हणाली.

तिने याबाबतीत तिची बहीण शाहीन हिची मदत घेतल्याचंही सांगितलं. शाहीन गेली बरीच वर्षं नैराश्याने ग्रस्त होती. त्यामुळे तिच्या मदतीने आपण विस्मरणावर नियंत्रण मिळवल्याचं आलियाचं म्हणणं आहे.