अलिबाग तालुक्यातील चिंचोटी ग्रामस्थांनी कुंपण टाकून गावचा रस्ता केला बंद

6321

कोरोनाची दहशत ही जगभर पसरली आहे. रायगड जिल्ह्यात कोरोनाचा धसका गावातील नागरिकांनी घेतला असून बाहेरच्या लोकांना गावात बंदी घालण्यात आलेली आहे. अलिबाग तालुक्यातील चिंचोटी ग्रामस्थांनी गावच्या वेशिवरील रस्ता कुंपण टाकून बंद केला आहे. त्यामुळे गावातील लोकांनी बाहेर जाण्यास आणि बाहेरील व्यक्तींनी आत येण्यास मज्जाव केला आहे. तर इतर काही गावातही ग्रामस्थांनी हे पाऊल उचलले आहे.

रायगड जिल्ह्यात परदेशातून आलेले हजारो नागरिक सध्या होम क्वारंटाईन मध्ये आहेत. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात संचारबंदी लागू केली असून नागरिकांना बाहेर पडण्यास बंदी केली आहे. महत्वाचे काम असल्यास बाहेर पडावे असेही प्रशासनाने आवाहन केले आहे. तर मुंबई पुणे शहरातून आलेल्या नागरिकांनीही होम कवारेन्टीन करा असे आवाहनही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.

कोरोना विषाणू हा संसर्गजन्य असल्याने त्याची लागण एकमेंकाना होत आहे. त्यामुळे गर्दी न करता घरातच राहावे असे शासनाने प्रत्येक नागरिकाला सांगितले आहे. अलिबाग तालुक्यातही नागरिकांनी घरात राहणे पसंत केले आहे. तालुक्यातील चिंचोटी ग्रामस्थांनी तर एक पाऊल पुढे जाऊन गावचा रस्ताच बंद केला आहे. गावच्या वेशीवर झाडा झुडपाचे काटेरी कुंपण टाकण्यात आले आहे. गावातील ग्रामस्थांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल उचलले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या