अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे कार्य कौतुकास्पद, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेली 93 वर्षे नागरीकरण बळकट करणाऱया अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे कार्य काैतुकास्पद व अनुकरणीय आहे, असे गौरवोद्गार राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच अंधेरीत काढले. तर वाढत्या नागरीकरणाचा विचार करता स्थानिक संस्था बळकट करणे ही काळाची गरज असल्याचे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.

अंधेरी (प.), जुहू गल्ली येथील संस्थेच्या मेयर सभागृहात आयोजित वार्षिक दीक्षान्त समारंभाचे प्रमुख म्हणून ते बोलत होते. तर समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे वस्त्र्ााsद्योगमंत्री अस्लम शेख उपस्थित होते. यावेळी कोविड काळात कोविड योद्धा म्हणून काम करणाऱया राज्यातील महानगरपालिका व नगरपालिका कर्मचाऱयांचा मंत्री एकनाथ शिंदे यांनी गौरव केला.

यावेळी मंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांना प्रशिक्षण देणे, महानगरपालिका, नगरपालिका यांच्यासाठी सॅनेटरी इन्स्पेक्टर, नर्सिंग, फायर ऑफिसर, एलएसजीडी, एलजीएस व अन्य अभ्यासक्रम तसेच केंद्र व राज्य सरकारच्या नागरीकरणाच्या योजना प्रभावीपणे राबवण्याचे काम ही संस्था करत आहे, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत

यावेळी संस्थेच्या कर्मचाऱयांच्या पगारातून जमा केलेला दोन लाखांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द केला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रणजीत चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे वरिष्ठ सल्लागार जयराज फाटक यांनी सर्वांचे आभार मानले.