हिंदुस्थानी रणरागिणींची नवी भरारी, MI-17 मधून आकाशात झेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ALL WOMEN CREW FLY MI-17 V5 IN IAF

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

इंडियन एअर फोर्सच्या फ्लाईट लेफ्टनंट ‘परुल भारद्वाज'(कॅप्टन), फ्लायिंग ऑफिसर ‘अमन निधी'(को-पायलट) आणि फ्लाईट लेफ्टनंट ‘हिना जैस्वाल'(फ्लाईट इंजिनिअर) या ‘MI-17 V 5’ हेलिकॉप्टर उडवणाऱ्या देशाच्या पहिल्या महिला ‘क्रू’ बनल्या आहेत. युद्धभूमीवर सामग्री ने-आण करणे, दुरुस्ती करणे यासाठी म्हणून वापरण्यात येणाऱ्या या हेलिकॉप्टरचे वापरण्यात येते. त्याचे प्रात्यक्षिक 27 मे 2019 ला IAF च्या या चार महिलांनी एअर कमांडच्या एअर बेसवरून केले.

फ्लाईट लेफ्टनंट ‘परुल भारद्वाज’ या मुळच्या मुकेरियन, पंजाब येथिल असून ‘MI- 17 व्ही 5’ हेलिकॉप्टर उडवणाऱ्या प्रथम महिला पायलट आहेत. फ्लायिंग ऑफिसर ‘अमन निधी’ या मुळच्या रांची येथिल असून झारखंड राज्यातून येणाऱ्या प्रथम महिला पायलट आहेत. तर फ्लाईट लेफ्टनंट ‘हिना जैस्वाल’ या चंदिगढ येथे राहत असून, हवाईदलाच्या पहिल्या महिला फ्लाईट इंजिनिअर आहेत.

या महिला पायलट्सनी हकीमपेठ एअर फोर्स स्टेशन, हैदराबाद येथिल हेलिकॉप्टर ट्रेनिंग स्कुल मधून प्रशिक्षण घेतले होते. आणि त्या पुढील अॅडव्हान्स प्रशिक्षण त्यांनी येलहंका एअर फोर्स स्टेशन, कर्नाटक येथून घेतले. ‘MI 17 V 5’ हेलिकॉप्टर उड्डाणासाठी तयार आहे की नाही याची तपासणी युनिट इंजिनिअरींग ऑफिसर स्क्वाडर्न लिडर रिचा अधिकारी यांनी केली होती. हवाई दलाच्या महिला अधिकाऱ्यांचं हे आणखी एक यश मानलं जात आहे.