पत्नीशी भांडणानंतर नराधम बापाचा तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार

28
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गुडगावमध्ये एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. येथे एका नराधमाने पत्नीशी झालेल्या भांडणाचा राग आपल्या तीन वर्षाच्या चिमुरडीवर काढला आणि बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पीडित चिमुरडीवर दिल्लीच्या सफरदगंज रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळचे उत्तर प्रदेशमधील कासगंज येथे राहणारे एक कुटुंब कामासाठी गुडगाव येथे राहाते. या कुटुंबाचा प्रमुख मानेसर वाहकाचे काम करतो. त्याला दोन मुली असून एक 3 वर्षाची तर एक 1 वर्षाची आहे. बुधवारी पती-पत्नीमध्ये कोणत्यातरी कारणावरून भांडण झाले. याच वादातून पतीने पत्नीला मारहाण केली. त्यामुळे रागावून ती आपल्या नातेवाईकांकडे निघून गेली. यावेळी जाताना तिने आपल्या 1 वर्षाच्या मुलीला सोबत नेले तर 3 वर्षाची मुलगी घरीच ठेवली. पत्नी घरात नसल्याचे पाहून संतापलेल्या पतीने आपल्याच चिमुरडीवर बलात्कार केला.

गुरुवारी पीडित मुलीची आई घरी आली तेव्हा तीन वर्षीय चिमुरडी बेशुद्धावस्थेत निपचित पडलेली होती. तिच्यासोबत बलात्कार झाल्याचे लक्षात आल्यावर तिने नातेवाीकांना बोलावले व उपचारासाठी रुग्णालयात नेते. प्राथमिक उपचारानंतर तिला दिल्लीच्या सफरदगंज रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. आधी आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु नंतर त्याने गुन्हा कबूल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या