निवडणुकीत घोडेबाजार थांबवणार, महायुती-आघाडीच्या उमेदवारांचे संयुक्त निवेदन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विविध माध्यमातुन घोडेबाजार चालु असल्याच्या वावड्या उठत असतानाच शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे व काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार भवानीदास कुलकर्णी यांनी संयुक्तपणे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे आम्ही दोघेही निवडणुकीत भ्रष्ट्र पध्दतीचा अवलंब करुन निवडणूक होऊ नये यासाठी प्रयत्नशिल असून आपापल्या पध्दतीने मतदारांशी संपर्क साधत असल्याचे कळविले आहे
.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, आम्ही उमेदवार, सर्व मतदारांपर्यंत आप-आपल्या पध्दतीने संपर्क साधून आपला पक्ष, आपली विचारसरणी, आपआपले सामाजिक-राजकीय कार्य याची माहिती देत मतदारांशी संपर्क साधुन त्यांना आम्ही केलेल्या कामाची दखल घेऊन आम्हाला मतदान करावे, असे आवाहन मतदारांना करीत आहोत. त्यामुळे मतदारांनी सुद्धा लोकशाही मजबुतीसाठी पारदर्शक निवडणुक करण्यासाठी आम्हांस सहकार्य करण्याचे आवाहन करीत असल्याचे त्यांनी या पत्रकात म्हटले आहे. प्रसिध्दीपत्रकावर शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अंबादास दानवे आणि काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार भवानीदास कुलकर्णी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.