अंबादास दानवे उद्या आढावा घेण्यासाठी शेवगावमध्ये

शेवगाव येथे झालेल्या घटनेची माहिती घेण्यासाठी राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे शेवगाव तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीमध्ये विशेष बैठक आयोजित केली असल्याची माहिती जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी दिली.

शेवगाव या ठिकाणी मागील आठवड्यामध्ये जातीय दंगल उफाळून आलेली होती. याचे पडसाद राज्यभर उमटले होते. या घटनेच्या संदर्भामध्ये पोलिसांनी शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून सुमारे अडीचशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला होता. यामध्ये आत्तापर्यंत 70 हुन अधिक जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेच्या संदर्भात मागील आठवड्यामध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी या ठिकाणी घटनेचा आढावा घेऊन व्यापाऱ्यांच्या समवेत चर्चाही केली होती. मात्र जोपर्यंत गुन्हेगारांना अटक करत नाही, तोपर्यंत आम्ही व्यापार बंद ठेवणार असे सांगितले व त्यानुसार चार दिवस व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला होता.

या घटनेचा आढावा घेण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे उद्या शेवगाव तालुक्याच्या दौऱ्यावर येत असेल छत्रपती संभाजीनगर होऊन ते शेवगाव या ठिकाणी सकाळी येणार आहे. पहिल्यांदी ते घटनास्थळाची पाहणी सकाळी 11 वाजता करणार आहे. त्यानंतर ते दुपारी एक वाजता व्यापारच्या समोर विशेष बैठक आयोजित केलेले आहे. त्यानंतर ते या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी या घटनेसंदर्भात चर्चा करणार आहे. यावेळी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.