
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून त्यांना राजधानीतील ‘एम्स’ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आपल्याला स्वाइन फ्लूने ग्रासले आहे अशी माहिती खुद्द शहा यांनीच आज ट्विटरवरून दिली.
शहा यांच्यावर ‘एम्स’मधील निष्णात डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत. ईश्वराची कृपा आणि आपणा सर्वांचे प्रेम, शुभेच्छांमुळे मी लवकर बरा होईन अशी आशा भाजप अध्यक्षांनी व्यक्त केली.




























































