अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे निधन 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे शनिवारी पहाटे पुणे येथे निधन झाले. ते 56 वर्षांचे होते. मागील वर्षभरापासून ते कर्करोगाशी लढा देत होते. कुलगुरू म्हणून डॉ. मालखेडे यांनी  11 सप्टेंबर 2021 रोजी अमरावती विद्यापीठाची सूत्रे सांभाळली होती.

डॉ. दिलीप मालखेडे पुणे येथील शासकीय कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग येथे यांत्रिकी अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक होते. त्यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी कुलगुरूपदी नियुक्ती केली होती. डॉ. मालखेडे हे दिल्ली येथील अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद येथे सल्लागार -1 या पदावर प्रतिनियुक्तीवर काम करीत होते.