
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये आयआयटी गोल्ड मेडल विजेता विद्यार्थी आनंद कुमारने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पदवी मिळवूनही त्याला सरकारी नोकरी न मिळाल्याने हताश झालेल्या आनंदने आत्महत्येचा मार्ग अवलंबिल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
आनंदने 2024मध्ये पीएसआयटी कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये बिटेक केले होते. तो संपूर्ण राज्यातून तिसरा आला होता. आनंदच्या या यशाबद्दल 13 ऑगस्ट 2024ला राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी आनंदला गोल्ड मेडल देऊन सन्मानित केले होते. सध्या तो एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहिली असून त्यात म्हटले की, मी 50 वेळा सरकारी नोकरीसाठी प्रयत्न केले. परंतु यशस्वी होऊ शकलो नाही. बाबा, मला माफ करा. सॉरी. असे त्याने चिठ्ठीत लिहिले आहे.




























































