तुम्ही एक प्रेरणादायी वडील… आनंद महिंद्रांनी सरफराज खानच्या वडिलांसाठी पोस्ट, सोबत दिली मोठी ऑफर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोट येथे खेळवला जातं आहे. या कसोटी सामन्याात हिंदुस्थानच्या संघात मुंबईच्या सरफारज खानने पदार्पण केले. पदार्पणात त्याने केलेल्या उत्कृष्ट खेळीचे कौतुक उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केले आहे. सरफराजचे कौतुक करतानाच त्यांनी त्याचे वडिल नौशाद खान यांचेही कौतुक केले. व त्यांना एक मोठी ऑफरच दिली.

मुंबईकर सरफराज खानने मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हिंदुस्थानच्या संघात आपले स्थान निर्माण केले आणि राजकोट येथील सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली. सरफारजने संधीचे सोनं केलं आणि शानदार कामगिरी करत 62 धावा ठोकल्या. सरफारजच्या फटकेबाजीमुळे सोशल मीडियावरही चाहत्यांनी त्याचे भरभरून कौतूक केले आहे. दरम्यान सरफराज जेव्हा पदार्पण करत होता. त्याला अनिल कुंबळे यांच्या हस्ते संघाची कॅप देण्यात आली. ती कॅप त्याने वडिलांना देताच ते अत्यंत भावूक झाले व त्यांना आपले अश्रू रोखता आले नाही. या बाप बेट्यांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

तो व्हिडीओ पाहून उद्योगपती आनंद महिंद्रा देखील भारावून गेले असून त्यांनी त्याबाबत एक ट्विट केले आहे.  ”हिंमत सोडू नकोस. कठीण परिश्रम, साहस, धैर्य. एका पित्याला मुलाचे मनोबल वाढवण्यासाठी यापेक्षा दुसरे चांगले गुण अजून काय असू शकतात? जर नौशाद खान यांनी माझ्याकडून भेट म्हणून थार ही गाडी स्वीकारली तर माझ्यासाठी ही भाग्याची आणि सन्मानाची बाब असेल” असे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले आहे.

सरफराजच्या या खडतर प्रवासात त्याच्या वडीलांची त्याचा मोलाची साथ लाभली. नौशाद यांनीच सरफराजला क्रिकेटचे धडे शिकवले आहेत. सरफराज खानने त्याच्या प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 3974 धावा केल्या असून यामध्ये 14 शतके आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे.