
रिलायन्स इंड्रस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे कनिष्ठ पुत्र अनंत अंबानी आणि एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट यांची कन्या राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या विधींना सुरूवात झाली असून गुजरातमधील जामनगर येथे लग्नापूर्वीच्या विधींना सुरूवात झाली आहे.
शुक्रवारी जामनगरमध्ये ‘लगन लखवानू’ हा पहिला सोहळा पार पडला. जामनगर मधील अंबानी कुटुंबाच्या फार्म हाऊसवर या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
View this post on Instagram
लगल लखवानू
या समारंभामध्ये लग्नाचे कांकोत्री म्हणजेच सर्वात पहिले आमंत्रण देवांना दिले जाते. तसेच लग्न बंधनात अडकणाऱ्या जोडप्याला आशिवार्द देऊन लग्नकार्य निर्विघ्न पार पडावे म्हणून हा विधी करण्यात येतो.
या सोहळ्यासाठी नववधू राधिका मर्चंटने अनामिका खन्नाने डिझाइन केलेला लेहेगा परिधान केला होता. तिचा लेहेंगा सिक्वीन पॅचने विविध रंगाच्या फुलांनी सजलेला होता. त्याचबरोबर गळ्यामध्ये थ्री- लेयर्ड डायमंड नेकलेस सेट, मांगटिक्का घातला होता. राधिका मर्चंटच्या या लूकचे फोटो मेकअप, हेअर आर्टिस्ट लवलीन रामचंदानी यांनी इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.






















































