
पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर आणि टीव्ही निवेदकाचा कार्यक्रमात वाद झाला. आपला अपमान झाल्याने शोएबने विश्लेषकपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच यापूर्वीही एका ज्येष्ठ खेळाडूने आपला अपमान केल्याचे शोएबने म्हटले आहे. तसेच आपल्या मनात कुणाबद्दल राग नसून फक्त प्रेम असल्याचे शोएबने म्हटले आहे.
निवेदनकाने कार्यक्रम सोडण्यास सांगितले
पीटीव्हीवर एका क्रिकेट कार्यक्रमाच्या चर्चेत शोएब अख्तर विश्लेषक म्हणून सामील झाला होता. तेव्हा निवेदकाने शोएबला कार्यक्रम सोडण्यास सांगितले. तेव्हा शोएबने माईक काढला आणि कार्यक्रमातून निघून गेला. तेव्हा निवेद नौमान नियाजने त्याला थांबवण्याचाही प्रयत्न केला नाही. निवेदच्या या कृतीमुळे उपस्थित पाहुणेही आश्चर्यचकित झाले.
सोशल मीडियावर चर्चा
दरम्यान शोएब कार्यक्रम सोडून जाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. कार्यक्रमात निवेदकाने पाकिस्तान न्युझीलँड सामन्यावर प्रश्न विचारला. शोएबने याकडे दुर्लक्ष करत गोलंदाज हॅरिस राऊफ बद्दल बोलण्यास सुरूवात केली. तसेच पाकिस्तान सुपर लीग ची टीम लाहोर कलंदर्स आणि प्रशिक्षक आकिबची प्रशंसा केली. यावरून निवेदकने नियाजने शोएबला कार्यक्रम सोडण्यास सांगितले. शोएबनेही माईक काढला आणि कार्यक्रम सोडला. यावरून नेटकर्यांनी नियाजला माफी मागण्यास सांगितले.
माझ्या हृद्यात फक्त प्रेम
या प्रकरणी शोएबने स्पष्टीकरण दिले आहे. यापूर्वीही एका ज्येष्ठ खेळाडूने आपला अपमान केल्याचे त्याने सांगितले. परंतु मी त्यांना काही प्रत्युत्तर दिले नाही. माझ्या हृदयात कुणाबद्दलही राग नाही, माझ्या हृदयात फक्त प्रेम आहे असे शोएब म्हणाला.
निवेदकाने मागितली माफी
या प्रकरणी निवेदक नौमान नियाझ यांनी माफी मागितली आहे. मला शोएबला असे म्हणायला नाही पाहिजे होतं. शोएब अख्तर क्रिकेटमधील मोठा स्टार आहे आणि मी त्याचा फॅन आहे असेही नियाज यांनी म्हटले आहे.




























































