
एका दोन वर्षांच्या मुलीचा गरम सांबाराच्या भांड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे. दुर्दैवी म्हणजे, ज्या दिवशी ही दुर्घटना घडली, त्याच दिवशी त्या मुलीचा वाढदिवस होता.
तेजस्वी असं या मुलीचं नाव आहे. आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातल्या कालागरा गावात राहणाऱ्या शिवा आणि भानुमत या जोडप्याची ती मुलगी होती. 13 फेब्रुवारी रोजी तिचा वाढदिवस होता. त्यामुळे शिवा आणि भानुमत यांनी घरात छोटीशी मेजवानी ठेवली होती.
या मेजवानीत शिवा आणि भानुमत हे दोघंही पाहुण्यांचं स्वागत आणि त्यांना जेवण वाढण्यात गर्क होते. त्यामुळे तेजस्वीकडे त्यांचं लक्ष गेलं नाही. तेजस्वी खेळता खेळता स्वयंपाक घरात गेली. तिथे ती खुर्चीवर चढून खेळू लागली. अचानक खुर्ची कलंडली आणि तेजस्वी त्याच्या बाजुला असलेल्या गरम सांबाराच्या भांड्यात पडली.
तिची किंकाळी ऐकून शिवा आणि भानुमत धावत आले. त्यांनी तिला तिरुवुरू येथील रुग्णालयात दाखल केलं. तिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला विजयवाडा येथील मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, दुर्दैवाने तिचा 14 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्युची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.




























































