रागाच्या भरात आईने मुलांवर केले चाकूने वार, चिमुकलीचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्लीतल्या मालवीयन नगर भागातील एका महिलेने आपल्या दोन मुलांवर चाकूने हल्ला केला आणि स्वतःवरही वार केले. यात तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहसिना आणि शमीम या दाम्पत्याला. पती व्यवसायाने ड्रायवर आहे. शुक्रवारी मोहसिना आणि शमीममध्ये जोरदार भांडणी झाली. नंतर सकाळी शमीम कामासाठी बाहेर पडला. तेव्हा मोहसिनाने रागाच्या भरात दोन्ही मुलांवर चाकूने वार केले. आणि स्वतःलाही जखमी केले. मोहसिनाच्या सासर्‍याच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तिघांनाही इस्पितळात दाखल केले तेव्हा मुलीला मृत घोषित करण्यात आले.  पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.