
अॅनिमल पॅनडेमिक प्रिपेयर्डनेस इनिशिएटिव्ह आणि जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने ‘अॅनिमल हेल्थ सिस्टीम सपोर्ट फॉर वन हेल्थ’ हे सर्वसमावेशक पद्धतीने प्राण्यांच्या समस्येचे निराकरण करून संभाव्य साथीला आळा घालण्याचा उपक्रम आहे. केंद्रीय मत्स्य पालन, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री परुषोत्तम रूपाला यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले.
यात संभाव्य प्राण्यांच्या साथीचा सामना करण्यासाठी देशाची तयारी आणि प्रतिसाद वाढवण्यासाठी पशू महामारी पूर्वतयारी उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमाचा उद्देश प्राणी आणि मानवी आरोग्यास धोका निर्माण करणाऱया प्राणीजन्य रोगांवर लक्ष केंद्रित करून साथीच्या रोगांविरुद्ध देशाची तयारी आणि प्रतिसाद वाढवणे हा आहे.


























































