
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंजली चक्रा आणि पाकिस्तानची तरुणी सुफी मलिक यांच्या प्रेमकथेची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. अंजली मूळची हिंदुस्थानची असून सुफी पाकिस्तानची मुस्लिम तरुणी आहे.

अंजली चक्रा हिने आपण समलैंगिक असल्याचे मान्य करत दोघींचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. समलैंगिक संबंधांबाबत गौप्यस्फोट केल्यापासून आपल्याला खुप प्रसिद्धी मिळाल्याचे तिने म्हटले. अनेक महिने गुपचूप भेटीगाठी घेतल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले.

समलैंगिक पार्टनरसोबत फोटो पोस्ट करण्यास सुरुवात केल्यानंतर माझे फॉलोअर्स वेगाने वाढू लागले. समलैंगिक संबंधांबाबत गौप्यस्फोट केल्यानंतर पहिला फोटो आपण हेअरकटचा केलेला. या हेअरकटला आम्ही दोघी ‘बायसेक्सुअल बॉब’ असेही तिने सांगितले.

आपण समलैंगिक आहोत हे दाखवण्यासाठी लूकमध्ये काहीतरी बदल करावा असे मला वाटत होते. परंतु LGBTQ समुदासारखे दिसण्यात गरज नसल्याचे जाणवले. त्यामुळे मी माझ्या मूळ लूकमध्येच अधिकाधिक बदल करू लागले, असेही अंजलीने सांगितले.

अंजली चक्रा आणि सुफी मलिक ही अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये राहते. न्यूयॉर्कमध्ये दोघींची पहिली भेट झाली होती. त्यानंतर एकमेकींना त्या डेट करू लागल्या. एका गेट टूगेदर दरम्यान अंजलीने सुफीचे चुंबन घेतले आणि दोघांच्या प्रेमकथेला रंग चढू लागला.

बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर आपला सुफीसोबत संवाद सुरू झाल्याचे अंजलीने सांगितले. सुफी समलैंगिक असल्याचे इन्स्टाग्रामद्वारे आपल्याला कळाल्याचेही तिने सांगितले.
























































