मत्स्य उद्योगासाठी ‘पंतप्रधान मत्स्य संपदा’ योजनेची घोषणा, जाणून घ्या वैशिष्ट्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अर्थसंकल्प मांडताना शेतीनंतर शेतीला पुरक पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय यावर लक्ष देण्यात आल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय यावर लक्ष केंद्रित करून कृषी कर्जाचे लक्ष्य 20 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवले​जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

‘पंतप्रधान मत्स्य संपदा योजना’ मच्छिमारांसह मत्स्य उद्योगाशी निगडित सर्व उद्योग घटकांसाठी ही योजना असणार आहे. यामध्ये 6 हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. ज्यामुळे या उद्योगाला मोठं बळ मिळणार असल्याचं निर्मला सीतारामन म्हणाल्या.

विकासासाठी सहकाराच्या मॉडेलला येत्या कालावधित प्राधान्य दिलं जाणार आहे. म्हणूनच सहाकार मंत्रालय तयार करण्यात आलं आहे.

कृषी कर्ज देणाऱ्या संस्थांच्या आधुनिकीकरणासाठी तांत्रिक दृष्ट्या त्यांना बळ देण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला गेला आहे. 216000 कोटीचा निधी दिला आहे. यासंस्थांचे संगणिकीकरण येत आहे.

डिसेंट्रलाइज स्टोरेज सेंटर उभी करण्याच्या विचार आहे. अन्न साठवण विकेंद्रीकरण योजनेच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात मदत केली जाणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

छोट्या सहकारी संस्थांच्या निर्मितीला प्रोत्साहन दिलं जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.