राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग – नगरच्या अनुराधा मिश्राला तीन सुवर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चेंबूर (मुंबई) येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग अॅण्ड बेंचप्रेस चॅम्पियनशीप स्पर्धेत नगरच्या अनुराधा मिश्रा हिने तीन सुवर्ण पदके पटकावण्याचा पराक्रम केला. या खेळाडूची दिल्ली येथे होणाऱया राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत विविध राज्यांतून मोठय़ा संख्येने महिला व पुरुष खेळाडू सहभागी झाले होते.

स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी पॉवरलिफ्टिंगमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले. अनुराधा मिश्राने 63 किलो वजन गटात बेंच प्रेस, स्कॉट्स व डेडलिफ्टमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. तर एका कास्य पदकासह चषक पटकावले. तसेच अनुराधा मिश्राची नगर जिह्यात होणाऱया पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मिश्रा या सावेडी येथील जिम स्ट्रायकरमध्ये प्रशिक्षक स्वप्नील मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.