AI नावाचा अणुबॉम्ब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

> स्पायडरमॅन

‘Now I am become Death, the destroyer of worlds’ असे उद्गार अणुबॉम्ब बनवल्याचा पश्चात्ताप झाल्यानंतर त्याचा निर्माता असलेल्या शास्त्रज्ञ ओपेनहायमर याने काढले होते असे म्हणतात. अगदी अशीच काहीशी घटना नुकतीच घडली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचे गॉडफादर म्हणून ओळखले जाणारे जेफ्री हिंटन यांनी नुकताच ‘गूगल’चा राजीनामा दिला आहे. त्यांनी AI च्या होत जाणाऱया विकासाबाबत धोक्याचा इशारादेखील दिला आहे. आपल्या इशाऱयात त्यांनी म्हटले आहे की, AI च्या वापराचे परिणाम भयानक असू शकतात. इथेच न थांबता हिंटन यांनी त्यांनी AI वर काम केल्याबद्दल आणि संशोधन केल्याबद्दल पश्चात्ताप होतो आहे, अशी जाहीर कबुलीदेखील दिली आहे.

AI च्या संभाव्य धोक्याबद्दल सुरुवातीपासून अनेकांनी जगाला सावध राहण्याचे इशारे दिले होते. AI च्या वाढत्या वापराने अनेकांच्या नोकऱयांवर तर संकट आले आहेच, पण अमेरिकेसह अनेक युरोपियन देशांनी त्यांच्या देशातील अनेक शाळा व कॉलेजेसमध्ये AI च्या वापरावर बंदी घातली आहे. कुठलेही कष्ट न घेता, बुद्धीचा वापर न करता विद्यार्थी सहजपणे AI च्या मदतीने घरचा अभ्यास पूर्ण करत आहेत, प्रोजेक्ट्स बनवत आहेत हे लक्षात येताच शाळा, कॉलेजेसनी हे पाऊल उचलले आहे.

या AI ची दहशत आता इतकी वाढायला लागली आहे की, अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये चक्क या संदर्भात एक सुरक्षा बैठक बोलावण्यात आलेली आहे. Google, OpenAI, Anthropic आणि Microsoft सारख्या दिग्गज पंपन्यांचे अधिकारी यावेळी AI चा वापर, त्याचे धोके या संदर्भात अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याशी चर्चा करणार आहेत. AI च्या वापराचे कुठलेही मोठे धोके आजवर जरी समोर आलेले नसले, तरी सामान्य लोकांना AI उपलब्ध करून देण्यापूर्वी त्याची सुरक्षितता पंपन्यांना निश्चित करावी लागणार आहे. AI माध्यमातून आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे काही प्रकार नुकतेच उघडकीस आले आहेत.