
>> मंगल गोगटे
आइसलँडमध्ये डास नाहीत, कारण या देशात येणाऱया विमानांमधून डासांना अजून येता आलेलं नाही. इथे पोचले असतील कदाचित, पण त्यांना अंडी घालायला योग्य अशी जागा इथे सापडली नाही. डासांच्या जीवनशैलीला साजेसं हवामान इथे नाही. सहजपणे जमणारं उथळ पाणी नाही आणि स्वच्छता खूप आहे.
जगात असे काही देश आहेत जिथे एकही मच्छर शोधून सापडणार नाही. त्यामुळे डास नसलेला देश असू शकतो यावर आपला विश्वास बसणे जरा कठीणच आहे. तरीही एक देश आहे, अगदी औषधालाही डास नसलेला. तो आहे, उत्तर अटलांटिक महासागराजवळ वसलेला आइसलँड. या देशाची लोकसंख्या अतिशय कमी आहे. या ठिकाणी 1300 प्रजातीचे जीव आढळतात. पण मात्र मच्छर सापडत नाहीत. आइसलँडच्या शेजारीच असलेल्या ग्रीनलँड, स्कॉटलँड, डेन्मार्क या देशांमध्ये मात्र मोठय़ा प्रमाणात मच्छर सापडतात. त्यामुळे आइसलँडमध्ये मच्छर न सापडणं हा संशोधनाचा विषय बनलेला आहे.
संशोधनात असं लक्षात आलं आहे की, आइसलँडमध्ये पाणी एका जागेवर स्थिर राहात नाही. त्यामुळे तिथे डासांची अंडी जगूच शकत नाहीत. कारण आपल्याला तर माहितीच आहे की डासांची अंडी जगण्यासाठी स्थिर पाण्याची आवश्यकता असते. पाणी जमा होऊन राहाणं हे डासांसाठी आमंत्रण आहे. आइसलँडमध्ये मात्र उणे 38 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान खाली जातं. त्यामुळे पाणी गोठतं आणि म्हणूनच इथे डास जगू शकत नाहीत. दुसऱया एका संशोधनानुसार आइसलँडची माती आणि पाणी यांच्या रासायनिक रचनेमुळे मच्छर या ठिकाणी जगणं अशक्य आहे. एवढंच काय, पण थंड तापमानामुळे साप किंवा सरपटणारे प्राणीदेखील इथे आढळत नाहीत.
आइसलँड हा जगातील पर्यटकांना खूप आकर्षित करतो. हा भाग म्हणजे अती आकर्षक ‘उत्तरी दिव्यां’चा! हे उत्तरी दिवे खात्रीने दिसण्याची जागा म्हणजे आइसलॅंड. याबरोबरच इथला भूप्रदेश ज्वालामुखी, गिझर्स, गरम पाण्याचे झरे, हिमनद्या व लाव्हारसाने बनलेली जमीन हे सगळंच एवढं आकर्षक आहे की हा भाग पाहून पर्यटक खूश होतात. इथे काढलेले मनमोहित करणारे येथील उत्तरी दिव्यांचे रंगीबेरंगी पह्टो आजकाल सोशल मीडियावर दिसत असतात आणि मग या दिव्यांच्या दिसण्याची स्वप्ने उराशी बाळगत अनेक पर्यटक उत्तरेकडील देशात फिरत असतात. शिवाय इथे डासांचं पूर्णतः गैरहजर असणं या प्रदेशाला जास्तीच आकर्षक बनवतं.
इथे डास नाहीत, कारण या देशात येणाऱया विमानांमधून डासांना अजून येता आलेलं नाही. इथे पोचले असतील कदाचित, पण त्यांना अंडी घालायला योग्य अशी जागा इथे सापडली नाही. डासांच्या जीवनशैलीला साजेसं हवामान इथे नाही. सहजपणे जमणारं उथळ पाणी नाही आणि स्वच्छता खूप आहे.
डासांच्या अळ्या पाण्यात राहतात आणि त्यातल्या सूक्ष्म जीवांवर व सेंद्रिय साहित्यावर जगतात. ग्रीनलॅंड आणि उत्तर स्पॅन्डेनेविया इथे हिवाळ्यामधे डासांची अंडी निष्क्रियतेच्या झोपेत जातात आणि शरद ऋतूमधे बर्फ वितळल्यावर जिवंत होतात. परंतु आइसलॅंड येथील हिवाळा तसा खात्रीचा नसतो आणि तिथे अचानक तापमान खाली वा वर जाऊ शकते. ज्यावेळी जेव्हा डासांची अंडी उबवली जातात तेव्हा लगेचच डासांना रक्त शोषून घेण्याची गरज असते. नंतर काही दिवस लागतात डास तयार व्हायला व मग अंडी घालण्यासाठी एक साथीदार मिळून अंडी घालायला. पण हे सगळं जीवनचक्र पूर्ण करण्याइतका वेळ डासांना मिळत नाही. कारण हवामान फार पटकन बदलते. अशा परिस्थितीत डासांची वसाहत निर्माण होणं केवळ अशक्य आहे.
अंटार्क्टिकामधेही डास नाहीत. येथील परिस्थिती डासांना जगण्यासाठी खूपच कठोर आहे. जरी खूप पर्यटक व शास्त्रज्ञ तिथे जात असले तरीही तिथे कुणीही माणसं वास्तव्य करत नाहीत. हा पृथ्वीवरील सर्वात थंड, कोरडा आणि वाऱयाचा खंड मानला जातो.
डासांना तर ओलसर दमट हवामान हवं असतं आणि इथे नेमपं तेच तर नाहीये. त्यामुळे डास नसलेल्या या देशातल्या आइसलँडिक इन्स्टिटय़ुट ऑफ नॅचरल हिस्टरीने एक डास अल्कोहोल असलेल्या एका बरणीत जतन केला आहे. हा डास 1980 मधे गिस्ली मर गिस्लसन या जीवशास्त्रज्ञास मिळाला जेव्हा ग्रीनलँडमधून आलेल्या एका विमानातून हा डास इथे पोचला. त्याला जिवंत पकडण्यासाठी गिस्लसनला डासामागे धावावं लागलं होतं.
z [email protected]




























































