
>> रविप्रकाश कुलकर्णी
दिवस उगवतो, दिवस मावळतो. दिवसामागून रात्र येते, रात्रीनंतर सकाळ होते. हे पा अखंड चाललेलं आहे. यालाच ज्याने कोणी कालप्रवाह म्हटले आहे, त्याच्या कल्पनाशक्तीला दादच द्यायला हवी. हे सृष्टिपा अव्याहत, अखंड चालूच आहे. ना त्याला आदी ना कधी अंत. हा निसर्पाम ठरलेला असूनही माणूस कालच्यापेक्षा उद्याकडे डोळे लावून असतो. उद्याची आशा त्याला उमेद देत असते, पल्लवित करत असते. माणसाचं मन वेगवेगळ्या गोष्टींनी झाकोळून जात असते. ती निराशा जाण्यासाठीच तर सण-उत्सव आदींची निर्मिती झाली आहे. शिवाय निसर्गाचा आरसा आमच्यासमोर सतत असतो. कुणा कवीने म्हटले आहे… ‘फांदीपासून अलगद निसटून पडते पान शिशिरात…’ तसे दिवस गळून जातात काळाच्या कॅनव्हासवरून, पण या पानगळीनंतरही येणार असते नवी पालवी. झाडांना याची असते खात्री. तसे वर्षाच्या सरत्या दिवसानंतर उगवणार आहे नवी पहाट याची खात्री आहे. तेव्हा झाड उभे राहणे महत्त्वाचे.
शाळेतल्या पहिल्या दिवशी कोऱया पाटीवरती ‘श्री गज्णेशाय नम’ ही अक्षरे गिरवून घेऊन अक्षरांचा ओनामा झाला. त्याचाच विस्तारलेला हा अक्षरांचा प्रदेश न संपणारा. पुस्तकांशी नाळ जुळणे म्हणजे काय हे कळायला ‘जावे त्याच्या वंशा,’ असेच म्हणावे लागेल. खरे सांगू का? आपल्या आवडीचा विषय असला की, नाळ जुळायला वेळ लागत नाही. त्याला स्थळ, काळ, वेळ यांचे बंधन राहत नाही. अशा वेळी मनावर कुठलेच ओझे राहत नाही. उदाहरण सांगतो. एके दिवशी मित्राचा फोन आला, “बाबुराव पटेल यांची किती लग्नं झाली होती? दोन का तीन?” मला कळेना की, या मित्राला बाबुराव पटेल यांची आठवण का यावी? तेव्हा त्याने सांगितले, चित्रपट अभ्यासक विजय पाडळकर यांनी ‘लोकसत्ता’ दिवाळी अंकात बाबुराव पटेलवर लेख लिहिलाय. मग यानिमित्ताने ‘मदर इंडिया’ चित्रपटाच्या प्रीमियरचीही आठवण झाली. या गोष्टीशी सुतराम संबंध नाही, पण विजय पाडळकरांचा लेख हे निमित्त झालं आणि वेडीवाकडी वळणं घेत गप्पा झाल्या. असंही सुखनिधान सापडायला लागते.
परवा अलगदपणे आधी सूर आणि त्यामागोमाग शब्द कानी आले…
‘माझिया दारात चिमण्या आल्या
बोल काहीसे बोलून गेल्या
कळले सारे नि कळले नाही
अबोध मनाची हासली जुई’
साध्या विषयात कवी आगळेवेगळे दर्शन घडवतो ते असे. हे कवी आहेत शंकर रामाणी. मात्र या कवितेकडे लक्ष वेधले ते पद्मजा फेणाणी यांच्या सुराने. साक्षात्कार म्हणतात तो हाच. अर्थात साक्षात्कार रोज होत नसतात. त्यासाठी साधना जशी आवश्यक असते तशी प्रतीक्षाही.
सुप्रसिद्ध लेखिका सानिया यांनी अलीकडेच ‘नाते स्वतशी’ या लेखात म्हटले आहे, आपला सतत संवाद चालू असतो तो आपला आपल्याशी. मनात नाना विचार चालू असतात. विचार कधी थांबले आहेत असे होत नाही. ती गजबज काही क्षण तात्पुरती का होईना, थांबवावी आणि मन निर्विकार होऊन जावे असे म्हटले जाते खरे. शिवाय या कृतीला ध्यानधारणा इत्यादी नावे दिली आहेत. ज्यायोगे आपण मोठय़ा आध्यात्मिक उंचीला पोहोचलो आहोत असाही भाव उत्पन्न होतो. पण प्रत्यक्षात ही साधना अवघड असते. आपल्या रोजच्या सामान्य आयुष्यात रोजचे प्रश्न सोडवत जगताना स्वतशी चाललेला संवाद मदत करत असतो. एकदा का स्वतशी संवाद जमला की, मग मधेमधे विश्रांती म्हणून काही शांत क्षण अनुभवता यावेत. या वर्षाच्या शेवटी पुन्हा एकदा सांगतो की, झाले ते झाले. उद्यापासून एक नवे वर्ष सुरू होत आहे आणि ते सांगत आहे –
‘तू चाल रे गडय़ा पुढे
तुला भीती कशाची आणि पर्वा कुणाची…’




























































