
>> रुपाली खैरमोडे-अंबुरे
आज कोरोना महामारीला युद्ध मानून आपण सगळेच एक समाज म्हणून एकत्रपणे लढतोय. त्याच एकजुटीने जर आपण स्त्रीच्या सबलीकरणासाठी एकत्र आलो तर मला वाटतं लवकरच स्त्री तिच्यावर लादलेल्या बेगडी स्त्रीपणाच्या बेडय़ा तोडून केवळ एक ‘माणूस’ म्हणून मोकळा श्वास घेऊ शकेल. जेव्हा हिंदुस्थानातील प्रत्येक स्त्री ‘माणूस’ म्हणून जगण्याचा निखळ आनंद घेऊ शकेल तेव्हाच खऱया अर्थाने आपला देश पुरोगामी ठरेल!
काल बऱयाच दिवसांनी नेटफ्लिक्सवर फेरफटका मारला. ‘जिंदगी इन शॉर्ट’ अशा वेगळया नावाची सीरिज दिसली. कुतूहल म्हणून बघायला गेले आणि एका पाठोपाठ एक सगळय़ा सात लघुकथा (Binge watch) / बिंज वॉच केल्या. सगळय़ा स्त्रीकेंद्री कथा. वेगवेगळय़ा आर्थिक, सामाजिक, धार्मिक घटकातल्या काही प्रातिनिधिक स्त्रिया आणि त्यांच्या दैनंदिन आयुष्यातल्या काही ठळक घटनांवर आधारित अशा या लघुकथा. मात्र या सगळय़ा स्त्र्ायांना बांधणारा एक समान धागा…… स्त्रीत्वाचा आणि स्त्रीविषयी असणाऱया समाजाच्या मानसिकतेचा!
हिंदुस्थानात जन्मलेली स्त्री, मग ती कोणत्याही धर्मात, समाजात, गरीब किंवा श्रीमंत कुटुंबात जन्माला आली तरी तिच्याकडून एक ‘स्त्री’ म्हणून समाजाच्या काही ठराविक अपेक्षा असतात. पूर्वीच्या काळी चूल आणि मूल यात अडकून पडलेली स्त्री शिक्षणाची कास धरून आज आधुनिक युगात खूप पुढे निघून गेली आहे. तिला मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करत तिने सगळय़ा क्षेत्रांत आघाडी घेतली आहे. पायलट, पोलीस, व्यवसाय, प्रशासन, राजकारण, पत्रकारिता अशा वेगवेगळय़ा क्षेत्रात तिने मिळवलेलं यश नेत्रदीपक आहे. माझ्या आजूबाजूला अशा यशस्वी स्त्रिया पाहिल्या की एक स्त्री म्हणून मला त्यांचा खूप अभिमान वाटतो. पण कधी कधी मनात शंका येते हे चित्र फसवं तर नाही ना? Tip of iceberg म्हणतात तसं. याच्या खोलात गेलो तर काही वेगळंच वास्तव नसेल ना? प्रयत्नांची पराकाष्ठा करत आज स्त्रीने जे यश मिळवलंय त्यामुळे ती खरोखरच सुखी, समाधानी झालीय का? आजच्या स्त्रीचा हॅपिनेस इंडेक्स जर काढला तर त्यात काय निष्कर्ष निघू शकेल? असे अनेक प्रश्न कदाचित माझ्यासारखे इतरांनाही पडत असतील.
आजच वर्तमानपत्रात ऑनलाइन नेटवर्क ‘लिंकड्रइन’च्या अपॉर्च्युनिटी इंडेक्स 2021 च्या अहवालाची बातमी वाचली. या अहवालानुसार कोरोना काळात देशातील ‘वार्ंकग वुमेन’वर जवळपास 50 टक्के अतिरिक्त ताण असल्याचं दिसून आलं. त्या तुलनेत पुरुषांवरील तणावाचं प्रमाण 38 टक्के आहे. कमावत्या स्त्री व पुरुषांच्या तणावामध्ये एवढी मोठी तफावत असण्याचे एकमेव कारण म्हणजे आपल्या समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा पक्षपाती दृष्टिकोन.
1956 मध्ये जे. फॉरेस्टर नावाच्या विद्वानाने ‘सिस्टिम थिंकिंग’ (system thinking) ही नवीन संकल्पना मांडली. त्यानंतर जगभर वेगवेगळय़ा क्षेत्रात ही संकल्पना वापरण्याचा प्रयत्न आजही चालू आहे. ही संकल्पना तुम्हाला कोणत्याही विषयाकडे पाहण्याचा एक व्यापक दृष्टिकोन देते. या संकलपनेनुसार कोणतीही सिस्टिम किंवा यंत्रणा ही त्यामध्ये असणाऱया विविध घटकांच्या अंतर्गत किंवा बाहय़ क्रियांवर अवलंबून असते. सिस्टिम थिंकिंगचा विचार जर आपण स्त्री आणि तिच्यावरील तणाव या संदर्भात केला तर असं दिसून येतं की स्त्री, तिचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे केवळ तिच्यापुरतं मर्यादित नसतं. ताणतणाव, त्यामुळे होणारं हार्मोन्सचं असंतुलन आणि त्याचा स्त्रीच्या शरीरावर होणारा परिणाम यामुळे केवळ ती स्त्री बाधित होत नाही तर तिच्या संपर्कात येणारं तिचं कुटुंब, तिचे ऑफिसमधले सहकारी आणि पर्यायाने ज्या समाजाचा ती एक अविभाज्य घटक आहे तो समाज अशा सगळयांवर दृश्य/अदृश्य परिणाम होत असतो. समाज ही जर एक सिस्टिम (यंत्रणा) मानली तर त्या यंत्रणेतला प्रत्येक स्वतंत्र घटक आणि त्या घटकावर होणारे अंतर्बाहय़ परिणाम यांचा त्या यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. स्त्री ही समाजाचा अविभाज्य घटक आहे. आणि म्हणूनच घरकाम आणि ऑफिस या दुहेरी चक्रात सापडलेल्या स्त्रीवर येणारा ताण आणि तिचं मानसिक आरोग्य या सगळयांचे चिंतन एक समाज म्हणून आपण सगळय़ांनी केलं पाहिजे.
मेट्रो शहरांमध्ये सुशिक्षित, विभक्त कुटुंबांतून काही प्रमाणात वेगळं चित्रं दिसायला सुरुवात झाली आहे. तरुण पिढीचे काही पुरुष स्वयंपाक घरात रमताना दिसत आहेत. विषेशतः कोरोना काळामध्ये अनेक पुरुषांनी घरकाम, बालसंगोपन अशा जबाबदाऱया उचलल्या आणि घरातल्या स्त्रीवर पडणारा भार कमी केला. कोरोनाचे कितीही दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागले असेले तरीही पुरुषांनी घरकामात घेतलेला पुढाकार ही कोरोनाचीच देणगी (Blessing in disguise) म्हणता येईल.
आज कोरोना महामारीला युद्ध मानून आपण सगळेच एक समाज म्हणून एकत्रपणे लढतोय. त्याच एकजुटीने जर आपण स्त्रीच्या सबलीकरणासाठी एकत्र आलो तर मला वाटतं लवकरच स्त्री तिच्यावर लादलेल्या बेगडी स्त्रीपणाच्या बेडय़ा तोडून केवळ एक ‘माणूस’ म्हणून मोकळा श्वास घेऊ शकेल. जेव्हा हिंदुस्थानातील प्रत्येक स्त्री ‘माणूस’ म्हणून जगण्याचा निखळ आनंद घेऊ शकेल तेव्हाच खऱया अर्थाने आपला देश पुरोगामी ठरेल!
नोकरदार स्त्री आणि तिच्यावर असणारा कामाचा तणाव हा नेहमीच अभ्यासाचा विषय राहिला आहे. घर आणि ऑफिस या दोन्ही जबाबदाऱया सांभाळताना स्त्रीची होणारी दमछाक बघून किती कुटुंबांतून तिला घरकामासाठी मदतीचा हात पुढे केला जातो? बालसंगोपन, घरकाम, कुटुंबातली आजारपणं ही आजही केवळ स्त्रीची जबाबदारी मानली जाते. या जबाबदाऱया सांभाळण्यासाठी किती टक्के पुरुष पुढाकार घेतात? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाला आपापल्या घरात मिळू शकेल!
(लेखिका नवी मुंबईच्या पोलीस उपायुक्त आहेत)
– [email protected]




























































