
>>मंगल गोगटे
1857 चा स्वातंत्र्य लढा बऱयाच हिंदुस्थानींना माहिती आहे, पण अजीजन बाई किती जणांना माहीत आहे? यांच्यासारख्याच अनेक व्यक्ती आहेत ज्यांनी अशा लढय़ांमध्ये भाग घेतला, शिवाय मोठी कामगिरी केली आहे. अशा अनेकांच्या आठवणी राहाव्यात म्हणून अशा सगळय़ांची बायोपिक बनवायच्या उद्देशाने जरा विसरल्या गेलेल्या क्रांतिकारी योद्धय़ांची नावे सगळय़ांच्या लक्षात आली आहेत.
अशाच एका भरीव कामगिरी केलेल्या व्यक्तीचं नाव आहे अजीजन बाई. हिंदुस्थानी इतिहास एवढा गौरवशाली आणि मोठा आहे की, अशा बायोपिकविना त्या व्यक्तींची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलीच नसती. अजीजन बाईंनी कानपूरच्या स्वातंत्र्य लढय़ात अनन्यसाधारण योगदान दिलं आहे. नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांच्या विचारांचा मोठा पगडा अजीजन बाईंच्या मनावर होता. या दोघांनी या लढय़ात इंग्रजांना त्या भागातून पूर्णपणे हद्दपार केलं होतं. अजीजन बाईंची इच्छा त्या लढय़ात केलेल्या कामगिरीची नोंद करून घेण्याची होती.
कानपूरच्या मूलगंज मोहल्ल्यात त्या नृत्यांगना म्हणून राहत होत्या. इंग्रजी शिपायांचं नृत्य करून त्या मनोरंजन करीत, पण तरीही त्या मनाने हिंदुस्थानी होत्या. इतिहासात अशी नोंद आढळते की, अजीजन बाई यांना घोडेस्वारी व तलवारबाजी येत होती. तसंच हत्यारं वापरण्याचीही सवय होती. शिवाय आजूबाजूला राहणाऱया वेश्यांनादेखील तलवारबाजीचं प्रशिक्षण त्यांनी दिलं होतं. एकदा इंग्रजांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, मेजर जनरल विलर यांना पकडण्याचा कट तात्यासाहेब व नानासाहेब यांनी ठरवला. याबाबतीत मदत करण्यासाठी त्यांनी अजीजन बाईंची मदत मागितली व एका विशिष्ट ठिकाणी त्यांना बोलावलं. तर त्या एक दिवस आधीच तिथे पोहोचल्या. कानपूर इंग्रजांच्या तावडीतून सोडवल्यानंतर जी विजयी मिरवणूक काढण्यात आली त्याच्यासाठी अजीजन बाई त्या मिरवणुकीच्या अग्रस्थानी होत्या.
400 सैनिकांची ‘मस्तानी मंडळी’ ही सैन्याची तुकडी बनविण्याची झालं. याचं काम इतर लोकांना हत्यारं, दारूगोळा, खाद्यपदार्थ पुरविणे हे हातं. तात्यासाहेब यांनी अजीजन बाईंना पाहिलं तेव्हा ते काही इंग्रजी अधिकाऱयांवर नजर ठेवून होते. ते अधिकारी बाईचं गाणे ऐकण्यासाठी तिथे आले होते. दोन दिवसांनी होळी होती. त्या उत्सवासाठी येण्याचं त्यांनी बाईंना आमंत्रण दिलं व ते त्यांनी मान्य केलं. होळीच्या संध्याकाळी त्यांनी विधूर नृत्य सादर केलं. मानधन देण्यासाठी तात्या टोपे पुढे जात असताना अजीजन बाईंनी देश सेवेची संधी मागितली. अजीजन बाईंना अनेक इंग्रज अधिकाऱयांचं वेळापत्रक माहीत असायचं. अधिकाऱयांवर नजर ठेवण्याच़ं, त्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळा बघण्याचे, क्रांतिकारकांविरुद्ध असलेल्या कटाची माहिती घेण्याचे काम बाई करायच्या.
आपला कानपूरचा विजय फार काळ टिकला नाही. अनेकांना इंग्रजांनी परत तुरुंगात टाकलं. अजीजन बाईंना यांच्याकडे दोन पर्याय पोहोचविण्यात आले. बाईंनी त्यांच्या फितुरीबद्दल क्षमा मागावी अथवा हॅवलोक यांच्याशी लग्न करावं. हे दोन्ही पर्याय ऐपून त्यांनी फक्त हास्य फेकले.
अजीजन बाईंनी दुसरा पर्याय निवडला हॅवलोक यांनी बाईंना गोळय़ा घातल्या. देशासाठी हसत प्राण देणाऱया आणखी एका क्रांतिकारीचा अध्याय इथे संपला.





























































