
चांगली नोकरी, जास्त पगार हे अनेकांचे स्वप्न असते. अनेकांची ही स्वप्नपूर्ती होते. मात्र असे असले तरी पैशांची बचत हे लोकांसमोरील मोठे आव्हान असते. आपल्या देशात आर्थिक नियोजनाचा अभाव दिसतो.
फायनान्शिअल एज्युकेशन कंपनी ‘फिनसेफ’ इंडियाने नुकताच एक आर्थिक सर्व्हे केला. यामध्ये 1346 नोकरदार लोकांनी सहभाग घेतला. त्यातून असे आढळून आले की, 57 टक्के लोक 20 टक्क्यांहून कमी बचत करतात, तर 24 टक्के लोक बचत करत नाही. बचतीची धारणा नसणे, महागडी जीवनशैली आणि मोठे कर्ज असणे अशा बाबी कारणीभूत आहेत. 48 टक्के लोकांनी नियोजनाचे आर्थिक उद्दिष्ट गाठणे हे आव्हान असल्याचे सांगितले.
सर्व्हेमध्ये सहभागी 48 टक्के लोकांनी कंपनीच्या मेडिकल कव्हरवर अवलंबून असल्याचे सांगितले. 23 टक्के लोकांनी मेडिकल एमर्जन्सीसाठी तयार नसल्याचे सांगितले.
इक्विटी, एफडी, इन्शुरन्स पॉलिसी अशा बाबींमध्ये 36 टक्के लोकांनी गुंतवणूक केल्याचे आढळून आले. 34 लोकांनी गुंतवणुकीकडे जराही लक्ष दिलेले नाही. कारण पैसे कुठे गुंतवायचे, हे माहीत नसल्याचे सांगितले.


























































