
पालक आपले उत्पन्न किती, आपण बचत किती व कुठे करतो, आपल्या कर्जाचा हप्ता किती आहे, या विषयांपासून मुलांना लांब ठेवतो.
पूर्वी 25 वर्षांत लग्न व्हायची आणि पर्यायाने मुलेही त्यामुळे मुलांच्या शिक्षणाच्या व लग्नाच्या जबाबदाऱया पालकांच्या निवृत्तीच्या आधी पार पडलेल्या असायच्या. आता लग्नाचे सरासरी वय 30 ते 35 झाले आहे. त्यामुळे नव्या पिढीतील पालक निवृत्त झाल्यावरसुद्धा जबाबदारीचे ओझे वाहताना दिसेल. त्यांना निवृत्तीनंतर काम करणे बंधनकारक राहील. आर्थिक साक्षरतेचे बाळकडू जर लहानपणीच मिळाले, तर पैशांबद्दल पुढील पिढी नक्कीच सज्ञानी होईल. आपल्या उत्पनापैकी पुढील ध्येयासाठी किती बचत करावी लागेल याची जाणीव त्यांना असेल. उत्पनाचा भाग कसा विभागला गेला पाहिजे? किती पैसे बचत करायचे? कर्जाचा हप्ता उत्पन्नाच्या किती प्रमाणात असला पाहिजे? स्वत:च्या राहणीमानासाठी किती खर्च करायचे? या सर्व गोष्टींविषयी मुलांना माहिती दिली पाहिजे.

























































