
प्रथम वर्ष पदवी प्रवेशेची तिसरी गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर झाली. या यादीत आर्ट्स शाखेला विद्यार्थ्यांची मागणी असल्याचे दिसून आले. काही नामांकित कॉलेजचा आर्ट्स शाखेचा कटऑफ नव्वदीपार आहे. मुंबई विद्यापीठाने आधीच जाहीर केल्याप्रमाणे काही कॉलेजनी अतिरिक्त तुकडी वाढवून घेतली आहे. झेवियर्स कॉलेजमध्ये आर्ट्ससाठी अतिरिक्त तुकडी सुरू झाली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत तिसऱया गुणवत्ता यादीतही तीन ते चार टक्क्यांची वाढ दिसत आहे. आर्ट्स शाखेखालोखाल कॉमर्स शाखा तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. गेल्या वर्षी 75 ते 80 टक्क्यांवर बंद झालेल्या सायन्स शाखेच्या तिसऱया यादीचा कट ऑफ यंदा 85 ते 90च्या दरम्यान पोहोचला. यंदा इंजिनीअरिंग तसेच वैद्यकीय प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक अद्याप जाहीर न झाल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना नियमित सायन्स शाखेमध्ये प्रवेश घेऊन ठेवले आहेत. झेविअर्स कॉलेजने बीएएमसीजे या अभ्यासक्रमासाठी नवीन तुकडी सुरू केली आहे. मात्र या तुकडीचा कट ऑफही नव्वदीपार आहे.
झेविअर्स कॉलेज
बीएसस्सी आयटी – 77.44, बीएएमसीजे (नवी तुकडी) – 91.72
पाटकर कॉलेज
बॅफ – 79.83, बीएससी आयटी – 73.5, बीएससी कम्प्युटर सायन्स ः 70.66, बीएमएस – 79.50
रुईया कॉलेज
बीए (इंग्रजी) – 94.83, बीए (सीअँडएम) इंग्रजी – आर्ट्स – 94.83, बीएस्सी – 83.3, बायोटेक्नॉलॉजी – 95.5
शाळा, कॉलेज सुरू करण्याबाबत निर्णय नाही, बोर्डाने पुरवणी परीक्षांबाबत फेरविचार करावा
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने अद्याप शाळा, कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे बोर्डाने सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये आयोजित केलेल्या दहावी, बारावीच्या लेखी फेरपरीक्षांचा पुनर्विचार करावा, अशी मागणी टीचर्स डेमोव्रॅटिक फ्रंटने केली आहे.
दहावी व बारावीच्या मुख्य परीक्षेत पास होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहेत. लेखी तसेच तोंडी, प्रात्यक्षिक आणि श्रेणी विषयांच्या परीक्षा असे परीक्षेचे स्वरूप आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा होऊ शकलेल्या नाहीत. परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे उत्तीर्ण करण्यात आले. यंदा पुरवणी परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांसमोर प्रत्यक्ष लेखी परीक्षांचा अनुभव नसल्याने त्यांना कुठल्या प्रकारचा अभ्यास करून तयारी करावी लागेल या बाबतीत मंडळाने खुलासा केलेला नाही, असे डेमोव्रॅटिक फ्रंटचे राजेश पांडय़ा यांनी सांगितले.
अद्याप शाळा सुरू करण्याचा स्पष्ट संकेत नसल्याने अशा स्थितीत पुरवणी परीक्षांना विद्यार्थ्यांनी कसे सामोरे जावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. फक्त प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी परीक्षावर आधारित आणि पूर्वीच्या वर्गातील अंतर्गत मूल्यमापनाप्रमाणे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

























































