
अरुणाचल प्रदेशमध्ये जनजातींसाठी काम करणारे कार्यकर्ते तेची गुबेन यांना ‘माय होम इंडिया’च्यावतीने ‘वन इंडिया अवॉर्ड’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
‘माय होम इंडिया’ ही संस्था ईशान्येकडील राज्यांमध्ये काम करणारी सामाजिक संस्था असून संस्थेच्यावतीने सामाजिक कार्याला वाहून घेतलेल्या व्यक्तीला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात हा पुरस्कार सोहळा झाला. भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर म्हणाले, तेची यांनी जनजातींच्या संरक्षण आणि विकास करण्यासाठी गुबेन यांनी उल्लेखनीय काम केले आहे, असे देवधर म्हणाले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. हरीश शेट्टी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे सीईओ आशीष चौहान, ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदार खराडे यांनी केले.


























































