आर्यन खान सुटला; समीर वानखेडे अडकले, केंद्र सरकारचे कारवाईचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टीवरील कारवाईप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला आज मोठा दिलासा मिळाला. एनसीबीने आर्यन खानसह सहा जणांना क्लीन चिट दिली असून आरोपपत्र दाखल करताना त्याच्यासह सहा जणांची नावे त्यातून वगळली आहेत. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यनला अडकवणारे एनसीबीचे तत्कालीन प्रमुख समीर वानखेडे मात्र पुरते अडकले असून पेंद्र सरकारने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. वानखेडे यांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत चुकीच्या पद्धतीने केला असा ठपका ठेवतानाच त्यांच्यावर पेंद्रीय गृह मंत्रालयाने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबईहून गोव्याला जाणाऱया कॉर्डिलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी होणार असल्याची खबर मिळाल्यानंतर एनसीबीने तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली 3 ऑक्टोबर 2021 रोजी कारवाई केली होती. तेव्हा क्रूझवर जाण्यासाठी आलेल्या आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांच्यासह 20 जणांना पकडण्यात आले होते. त्यानंतर या सर्वांना अटक करून एनसीबीने त्यांच्याकडे ड्रग्जबाबत कसून चौकशी केली होती, मात्र त्यावेळी आर्यनकडे कुठलेही ड्रग्ज सापडले नव्हते. त्यावेळी त्याची वैद्यकीय तपासणीदेखील केली नव्हती. मात्र तरीही आर्यनची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली होती. आर्यन तब्बल महिनाभर कारागृहात होता. समीर वानखेडे यांच्या या कारवाईचा मोठा गाजावाजा झाला होता. किल्ला कोर्ट सत्र न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयाने आर्यनला जामीन देत दिलासा दिला होता.

वानखेडे यांनी भाजपचा कार्यकर्ता असलेला आणि फसवणुकीच्या गुन्हय़ात पोलिसांना हवा असलेला किरण गोसावी याला या प्रकरणात कारवाईसाठी नेले होते. गोसावीने आर्यनसोबतचे पह्टो व्हायरल केल्यानंतर राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वानखेडे यांचे जातप्रमाणपत्रही बोगस असल्याचा पर्दाफाश मलिक यांनी पुराव्यासह केला. त्यानंतर वानखेडे यांची एनसीबीतून उचलबांगडी करून डीआरआय विभागात बदली करण्यात आली.
नाकाxटिक पंट्रोल ब्युरोने शुक्रवारी एनडीपीएस कोर्टात आरोपपत्र सादर केले. या आरोपपत्रात आर्यन खानच्या नावाचा समावेश नव्हता. ड्रग्ज प्रकरणात आर्यनविरुद्ध कोणताही पुरावा सापडला नाही. आर्यनसह मानव सिंघल, अविन साहू, गोपाळ आनंद, समीर सैघन, भास्कर अरोरा यांना एनसीबीने क्लिनचीट दिली. मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांची नावे मात्र आरोपपत्रात आहेत. याप्रकरणी 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

अर्थ मंत्रालय कारवाई करणार

किरण गोसावीसारख्या खासगी व्यक्तींना हाताशी घेऊन वानखेडे यांनी केलेल्या या कारवाईवर सर्व स्तरातून टीकेची झोड उठली होती. गोसावी याचा अंगरक्षक व या प्रकरणातील पंच प्रमोद साईल यानेदेखील त्या बोगस कारवाईबाबत मोठा गौप्यस्पह्ट केला होता. त्यामुळे वानखेडे यांच्या त्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. अखेर याची गंभीर दखल घेत दिल्लीस्थित एनसीबीच्या मुख्यालयाने या प्रकरणाची सत्यता तपासण्यासाठी डीडीजी संजय कुमार ंिसग यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. आर्यनला क्लीन चिट मिळाल्यामुळे समीर वानखेडे यांनी केलेली ती कारवाई बोगस होती हे आज स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पेंद्र सरकारने याप्रकरणी कारवाईचे आदेश दिले असून वानखेडे हे महसूल अधिकारी असल्याने गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार वानखेडेंवर अर्थ मंत्रालय कारवाई करणार आहे.

बोगस जात प्रमाणपत्राबाबतही कारवाई होणार
समीर वानखेडे यांनी बोगस जात प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचा आरोप करण्यात आला होता. या बोगस जात प्रमाणपत्राबाबतही त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले.
सॉरी, सॉरी… मला काहीं बोलायचे नाही – वानखेडे
आर्यन खानला क्लीन चिट मिळाल्याबाबत एका वृत्तवाहिनीने विचारले असता सॉरी, सॉरी… मला याबाबत काहीच बोलायचे नाही. मी आता एनसीबीमध्ये नाही, त्यामुळे तुम्ही एनसीबी अधिकाऱयांशी बोला, असे म्हणत समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.

वानखेडे यांच्या टीमकडून तपास करताना मोठय़ा चुका झाल्या आहेत. – संजय सिंह (उपसंचालक, एनसीबी)

आर्यन खानला क्लीन चिट का मिळाली
– आर्यनला अडकवायचेच असे ठरवून तपास अधिकाऱयांनी या प्रकरणाचा तपास केला.
– आर्यनने स्वतःहून आपला पह्न तपास अधिकाऱयांच्या ताब्यात दिला. मात्र त्याचा पह्न ताब्यात घेण्याची प्रक्रिया नियमानुसार झाली नाही.
– अनेक लोकांना व्हॉट्सअॅप चॅटच्या आधारे तपासासाठी बोलावण्यात आले ते अयोग्य होते. कारण सर्वोच्च न्यायालयाने पुरावा म्हणून व्हॉट्स अॅप चॅट गृहित धरता येणार नाही असे आदेश दिले आहेत.
– तपासात आर्यनकडे अमली पदार्थ सापडले नव्हते.
– अरबाज मर्चंटकडे सापडलेले अमली पदार्थ हे त्याने स्वतःसाठी आणल्याचे तपास अधिकाऱयांना सांगितले. ते आर्यनसाठी आणल्याचे त्याने कुठेही नमूद केले नाही.