नागपूरमध्ये बॉयफ्रेंडकडून मॉडेलची निर्घृण हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नागपूर

नागपूरमध्ये एका मॉडेलची तिच्या बॉयफ्रेंडने निर्घृणपणे हत्या केली आहे. खुशी परिहार असे त्या मॉडेलचे नाव असून अश्रफ शेख या तिच्या बॉयफ्रेंडसोबत ती लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहत होती.

खुशी परिहारचा मृतदेह केलवा पांडुरमा महामार्गावर सापडला असून तिचा चेहऱ्यावर अवजड वस्तूने प्रहार करून त्याचा चेंदामेंदा करण्यात आला आहे. शनिवारी काही स्थानिकांना तिचा मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांनी याबाबत तपास केल्यानंतर तो मृतदेह खुशीचा असल्याचे समोर आले. याप्रकरणी चौकशीसाठी खुशीचा बॉयफ्रेंड अश्रफला ताब्यात घेतल्यानंतर त्याने त्याचा गुन्हा कबूल केला.