
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपविरोधात मजकूर टाकणाऱ्यांविरोधात देशद्रोही किंवा काँगेसचा एजंट असा शिक्का मारणाऱ्या अतिउत्साही मोदीभक्तांनी नम्रतेने पलटवार कसा करायचा याची ‘शाळा’ भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी घेतली. त्यांनी देशभरातील ३०० जणांची शिकवणी घेतली. २०१४ च्या नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेच्या विजयात व त्यांच्या प्रतिमा निर्मितीत सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. मात्र, मोदी सरकार सर्वच पातळ्यावर गेल्या चार वर्षांत सपशेल अपयशी ठरत आहे. सोशल मीडियावर मोदी सरकारची बाजू सावरण्याची आणि विरोधकांवर टीकास्त्र करणारे मात्र उघडे पडत आहेत. देशभरातील वातावरण भाजपविरोधी असताना आक्रमक व नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार करता येईल, बॅकफुटवर गेलेल्या मोदी समर्थकांनी सोशल मीडियावर विरोधी प्रचार कसा मोडीत काढायचा, याचे मार्गदर्शन त्यांनी केले.






















































