
पाहुण्यांना सोडण्यासाठी दुचाकीवर जात असताना माठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गाडीला धक्का दिला. त्यामुळे संबंधिताने त्यांना गाडी सावकाश चालवा असे सांगितले. गाडी सावकाश चालवा सांगितचल्याचा राग आल्यामुळे त्या तरुणांनी दुचाकीस्वारावर कात्रीने हल्ला करुन त्यांना जखमी केले. ही घटना शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दांडेकर पूलाजवळ घडली. याप्रकरणी ऋतीक विलास खाटपे (रा. दांडेकर पूल) आणि सूरज शिवप्पा चलवादी (रा. पानमळा, सिंहगड रोड) यांना अटक करण्यात आली आहे. तर साहेब चाँदसाब सय्यद (वय 51, रा. उत्तमनगर ) असे हल्ल्यात जखमी झालेल्यांचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी सय्यद दुचाकीवरुन पाहुण्यांना सोडण्यासाठी स्वागरेटला जात होते. त्यावेळी दांडेकर पूलाजवळ पाठीमागून आलेल्या ऋतिकने त्यांच्या गाडीला धडक दिली. त्यामुळे सय्यद यांनी त्यांना गाडी सावकाश चालवा असे सांगितले. त्याचा राग आल्यामुळे ऋतीक अणि सूरजने सय्यद यांना काठीने मारहाण करुन त्यांच्यावर कात्रीने हल्ला केला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सतीश केंचे तपास करीत आहेत.



























































