अधिवेशन काळात सभागृहात पूर्णवेळ उपस्थित रहा! शिवसेनेच्या आमदारांना व्हिप जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य विधिमंडळाचे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन 5 व 6 जुलै रोजी पार पडणार आहे. या अधिवेशनादरम्यान पुरवणी मागण्या तसेच महत्त्वाचे अध्यादेश मांडले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर   अधिवेशन संपेपर्यंत आमदारांनी सभागृहात उपस्थित राहावे, असा व्हिप शिवसेनेचे विधानसभेतील मुख्य प्रतोद, आमदार सुनील प्रभू यांनी आमदारांना काढला आहे.

दोन दिवसांच्या अधिवेशनादरम्यान महत्त्वाचे कामकाज पार पडणार आहे. अधिवेशनात पुरवणी मागण्या, शासकीय कामकाज आणि पुरवणी विनियोजन विधेयके यावर चर्चा, मतदान करून मंजूर करण्यात येणार आहेत. त्यामुळे या अधिवेशनात आमदारांनी  संपूर्ण दिवस उपस्थित राहावे असा पक्षादेश आहे. यासाठी दर अधिवेशनाप्रमाणे याही अधिवेशनात व्हिप जारी करण्यात आला असल्याचे आमदार सुनील प्रभू यांनी सांगितले.