संभाजीनगरात मंगळवारपासून संचारबंदी, जीवनावश्यक वस्तू 12 वाजेपर्यंत मिळणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे, कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलणे सुरू केले असून येत्या मंगळवारपासून (ता.30 मार्च) 8 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतला आहे. यासंबधीचा आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी आज शनिवारी रोजी जारी केला आहे.