संभाजीनगर जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये अंशतः बदल, बुधवारी रात्री 12 नंतर संचारबंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संभाजीनगर जिल्ह्यात मंगळवार पासून घोषित करण्यात आलेल्या अंशतः लॉकडाऊनमध्ये एक दिवसाची मुदतवाढ जिल्हाधिकारी कार्यालयाने घोषित केली आहे. त्यामुळे उद्या मंगळवारी सर्व अस्थपना कार्यालय यापूर्वीच्या सुचनेनियमावलीनुसार सुरू ठेवण्यात मुभा देण्यात आली आहे.

त्यामुळे आता बुधवारी रात्री 31 मार्च रोजी रात्री 12 नंतर जिल्हाभरात कलम 144 नुसार संचार बंदी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहेत.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढत आहे. जिल्ह्यात सर्वच हॉस्पिटल दवाखान्यांमध्ये बेडची संख्या अपुरी पडत आहे. हा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी कडक लॉकडाऊन करण्याची गरज असल्याने जिल्हा प्रशासनाने ताठर भूमिका घेऊन दोन दिवसांपूर्वी उद्या मंगळवारपासून जिल्ह्यात कलम 144 नुसार संचारबंदी घोषित केली होती.

यामध्ये औद्योगिक वसाहत, पेट्रोलपंप, भाजीपाला, दुधडेअरी, मटन दुकानास सकाळी 6 ते 11 पर्यंत तर काहींना 8 ते 12 पर्यंत सूट देण्यात आली होती. या अत्यावशक सेवा वगळता सर्वंत संचारबंदी अंतर्गत लॉकडाऊन करण्यात आला होता.

या आदेशामध्ये आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाने बदल करून 30 मार्चपासून पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये बदल करून 31 मार्च रोजी रात्री 12 नंतर हे नियम लागू करण्याचे ठरविले आहे.

त्यामुळे यापुर्वी दिलेल्या आदेशानुसार वरिल अस्थापनाच्या नियमात केवळ कोविड सेंटर केअरमधील रुग्णांची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन हॉटेल्समधून रात्री 8 पर्यंत पार्सल सेवा सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र विनाकरण फिरणाऱ्यांना पेट्रोल दिल्या जाणार नसल्याचे कळविले आहे.