
संभाजीनगर शहरात कोरोनाच्या तिस-या लाटेचा धोका वाढत चालला आहे. शनिवारी 23 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी हर्सुल तुरुंगातील 14 कैदी पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती समोर आली आहे. मनपाच्या आरोग्य विभागानेही दुजोरा दिला असून बारा कैद्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाँ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
शहरात कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली आहे. मात्र तिसरी लाट येण्याचा धोका असल्याचे प्रशासनाने यापूवीँच जाहिर केले आहे. तरी दखील नागरिकांकडून दुर्लक्ष होत आहे. मनपाने कोरोना चाचण्यांची संख्या वाढविल्या असून दररोज सुमारे अडीच हजार चाचण्या होत आहे. शहरातील प्रवेशाची ठिकाणे, सरकारी कार्यालये, रेल्वे स्टेशन, विमानतळ या ठिकाणी नागरिकांच्या चाचण्या होत आहे. त्यासोबतच शहरात सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. डेंग्यू, मलेरिया, चिकून गुणियांची संख्या वाढल्यामुळे कोरोनाचा धोका वाढला आहे.
यापूर्वी कोरोना रुग्णांची संख्या दहाच्या आत निघत होती. परंतु काल शनिवारी शहरात कोरोनाचे 23 रुग्ण आढळले. त्यापैकी हर्सुल तुरुंगातील 14 कैदी पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे शहरात तिसरी लाट झपाट्याने पसरण्याचा धोका वाढला आहे.
महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डा. नीता पाडळकर म्हणाल्या की, हर्सुल तुरुंगातील बारा कैदी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मात्र त्यांच्यात कोणतेही लक्षणे आढळून आलेली नाहीत. जेल मधील एक हजार कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
या 14 कैद्याना स्वतंत्र ठेवण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्याकरिता नागरिकांनी काळजी घ्यावी. गर्दी टाळावी, मास्कचा वापर करावा, सँनेटायझरचा वापर करावा, सुरक्षीत अंतर ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

























































