
ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने वन डे क्रिकेटमध्ये सलग 22 सामने जिंकून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. ऑस्ट्रेलियन संघाची कर्णधार मेग लेनिंगने आपल्या देशातील पुरुष संघाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगचा 17 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला.
लेनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने रविवारी न्यूझीलंडचा 6 गडी राखून पराभव करून सलग 22 वा विजय संपादन केला. याआधी, रिकी पॉण्टिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघाने 2003 मध्ये सलग 21 वन डे सामने जिंकण्याचा विक्रम केला होता. लेनिंगने पॉण्टिंगचा तो व्रिकम मोडीत काढला.
41 महिन्यांत 22 विजय
ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 41 महिन्यांत सलग 22 विजय मिळविले. दरम्यान, कोरोनामुळे तर वर्षभर क्रिकेट बंदच होते. अन्यथा या संघाने आधीच या विक्रमाला गवसणी घातली असती.

























































