Royal Enfield Classic 350 हिंदुस्थानात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकप्रिय दुचाकी उत्पादक कंपनी Royal Enfield आपली नवीन Classic 350 बाईक हिंदुस्थानात लॉन्च केली आहे. अनेक चाहते या बाईकची बर्याच काळापासून वाट पाहत होते. जी आता अपडेट फीचर्ससह हिंदुस्थानात लॉन्च झाली आहे. ही बाईक अनेकवेळा टेस्टिंग दरम्यान दिसली आहे. कंपनीने याची किंमत 1.84 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवली आहे.

Royal Enfield च्या इतर बाईक बद्दल बोलायचे झाले तर याच्या Classic 350 Halcyon ची किंमत कंपनीने 1.93 लाख रुपये इतकी आहे. 2021 रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ची किंमत 2.04 लाख रुपये आहे. तसेच क्लासिक डार्क एडिशनची किंमत 2.11 लाख रुपये आहे. सेगमेंटच्या टॉप-ऑफ-द-लाइन क्रोम क्लासिक 350 ची किंमत 2.51 लाख रुपये आहे. या सर्व एक्स-शोरूम किंमत आहेत. कंपनीने या बाईक्सची बुकिंग अधिकृत डीलरशिपवर सुरू केली आहे.

इंजिन आणि पॉवर

अपडेटेड क्लासिक 350 मध्ये 350 सीसी, एअर-ऑइल कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हेच इंजिन Meteor 350 मध्ये देखील देण्यात आले आहे. जे 20.2 बीएचपी आणि 27 एनएम टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडण्यात आले आहे. हे नेक्स्ट जनरेशन 350 सीसी मोटर सर्व 350 सीसी रॉयल एनफील्ड बाईकमध्ये वापरली जाणार आहे.