BS6 Maruti Suzuki Eeco S-CNG हिंदुस्थानात लॉन्च; किंमत किती?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील प्रसिद्ध कार निर्माता कंपनी Maruti Suzuki India ने आपली नवीन Maruti Suzuki Eeco S-CNG कार BS6 इंजिनसह हिंदुस्थानात लॉन्च केली आहे. आज आम्ही तुम्हाला या कारच्या फीचर्स आणि किंमत बद्दल सांगणार आहोत.

फीचर्स

BS6 Maruti Suzuki Eeco मध्ये ड्रायव्हर एअरबॅग, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, ईबीडी, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, सीट बेल्ट आणि हाय स्पीड अलर्ट यासारखे सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. ब्रेकिंग सिस्टमबद्दल बोलताना बोलायचे झाले तर या कार मध्ये पुढच्या भागात डिस्क आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक देण्यात आले आहे. ही कार 5 आणि 7 सीटर प्रकारांमध्ये येते. मायलेजच्या बाबतीत ही कार प्रति सीएनजी 21.94 किलोमीटरचे मायलेज देऊ शकते

किंमत

BS6 Maruti Suzuki Eeco S-CNG परंभीक किंमत ही 4.64 लाख रुपये इतकी आहे.