बालिका वधू या मालिकेतून घराघरात पोहचलेली लहान आनंदी म्हणजेच अभिनेत्री अविका गोर ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अविकाने तिचे वजन घटवले असून तिच्यातील बदल पाहून चाहतेही आश्चर्यचकीत झाले आहेत. अविकाने तिचे हॉट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.
अविकाने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर करत तिच्या ट्रान्स्फॉर्मेशनबद्दल सांगितले होते. पूर्वी काहीशी जाडसर शरीरयष्टीची असलेली अविका आता अगदी सडपातळ झाली असून तिचे ग्लॅमरस फोटो पाहून तिच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही. अविका ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री असल्याने तिचे सोशल मीडियावर चाहतेही भरपूर आहेत. अविका गेली चार वर्ष कान्स फिल्म फेस्टिव्हललाही हजेरी लावत आहे.
अविका गोर ही तिच्या वयाच्या दुप्पट वयाच्या अभिनेत्याला डेट करण्यावरून देखील चर्चेत आली होती. अविकाचे तिचा ससुराल सिमर का या मालिकेतील कोस्टर मनीष रायसिंग सोबत अफेयरल होते. मनीष हा अविकापेक्षा तब्बल 19 वर्षांनी मोठा होता. आता मात्र या दोघांचे ब्रेकअप झाले असून मनीषचे लग्न देखील ठरले आहे.