
मुंबईत 23 तर पुण्यात 13 रुग्ण
कोरोनाची संख्या कमी होत असतानाच व्हेरिएंट बीए 5 व बीए 2.75 रुग्ण संख्येत मात्र झपाटय़ाने वाढ होताना दिवस आहे. राज्यात बीए 5 व्हेरिएंटचे 26 रुग्ण आढळले तर बीए 2.75 व्हेरिएंटचे 13 रुग्ण आढळले. या दोन्ही व्हेरिएंटचे एकूण 23 रुग्ण एकटय़ा मुंबईत आढळले आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्यात बीए व्हेरिएंटचा धोका वाढला आहे.
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे आणि बी. जे. वैद्यकीय, पुणे यांच्या अहवालानुसार राज्यात बीए-5 चे 26 रुग्ण आढळले आहेत तर बीए-2.75 व्हेरियंटचे 13 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 23 रुग्ण मुंबईतील तर 13 रुग्ण पुणे येथील आहेत तर बुलढाणा, ठाणे आणि लातूर येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. हे सर्व नमुने 29 जून ते 4 जुलै या कालावधीतील आहेत. दरम्यान, राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए-4 आणि बीए-5 रुग्णांची संख्या 158 तर बीए-2.75 रुग्णांची संख्या 70 वर पोहोचली आहे.
बीए-4 आणि 5
पुणे – 91, मुंबई – 51, ठाणे – 5, नागपूर पालघर – प्रत्येकी 4, रायगड – 3
बीए-2.75
पुणे – 43, नागपूर – 14, मुंबई – 5, अकोला – 4, ठाणे, यवतमाळ, बुलढाणा, लातूर- प्रत्येकी 1
राज्य, मुंबईत रुग्णसंख्या घटली; एकही मृत्यू नाही
राज्यासह मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून राज्यात एकही मृत्यू झालेला नाही. राज्यात आज दिवसभरात 1 हजार 111 रुग्ण सापडले तर 1 हजार 474 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रुग्णांची संख्या 15 हजार 162 वर पोहोचली आहे. मुंबईत रुग्ण संख्या झपाटय़ाने कमी होत असून आज 167 रुग्ण सापडले तर 235 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रुग्णांची संख्या कमी होऊन ती 2 हजार 232 वर पोहोचली आहे.






























































