इथे संस्कारी जिन्स आणि लंगोट मिळेल! रामदेवबाबांचे कपड्यांचे दुकान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली 

योगगुरू रामदेवबाबांच्या कंपनीने आता कपडे उद्योगात पाय रोवले आहेत. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर दिल्लीच्या पीतमपुरा भागात पतंजलीच्या स्टोअरचे आज रामदेवबाबा आणि निर्माता मधुर भांडारकर, पहेलवान सुशीलकुमार उपस्थित होते. स्टोअरमध्ये लंगोटपासून कोटपर्यंत, संस्कारी जिन्स, कुर्ते, पार्टी वेयर असे वैविध्यपूर्ण 3500 प्रकारचे स्वदेशी कपडे मिळतील. डिसेंबरपर्यंत देशभरात 25 नवीन स्टोअर सुरू केले जाणार आहेत, अशी माहिती रामदेवबाबा यांनी उद्घाटनप्रसंगी दिली.  लिवफिट, आस्था आणि संस्कार अशा ब्रँडमध्ये हे कपडे उपलब्ध आहेत. स्टोअरमध्ये 1100 रुपयांत जिन्स विक्रीला आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर 25 टक्के सवलत दिली जाणार आहे.