
बांगलादेश प्रीमियर लीगचा नववा हंगाम सुरू झाला आहे. या हंगामाचे 8 सामने खेळले गेले आहेत. मात्र प्रत्येक हंगामाप्रमाणेच यंदाही वाद सुरू झाले आहेत. यावेळीही शाकिब अल हसन त्याच्या भांडखोर स्वभावामुळे चर्चेत आहे. या मोसमात एका सामन्यात शाकिबची वाइड बॉल न दिल्याने मैदानावरील पंचाशी जोरदार वादावादी झाली. फॉर्च्युन बरीशाल आणि रंगपूर रायडर्स यांच्यातील मंगळवारच्या सामन्यादरम्यान, शाकिबची दादागिरी पुन्हा एकदा दिसून आली. पंचांचा निर्णय न पटल्याने शाकिब थेट चप्पल घालून डगआउटमधून बाहेर पडला आणि चालत मैदानात पोहोचला. यावेळी त्याची पंचांशी जोरदार वादावादी झाली.
फॉर्च्युन बारीशालच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी अनामुल हक बिजॉय आणि चतुरंगा डी सिल्वा हे डावाची सुरुवात करण्यासाठी क्रीझवर आले. पण स्ट्राईकवर कोणी राहायचे हे दोघे ठरवू शकले नाहीत. यामुळे मैदानावर गोंधळ उडाला. डावखुरा वेगवान गोलंदाज रकिबुल हसनच्या हातात चेंडू होता आणि तो गोलंदाजी करण्यास तयार होता, तेव्हा डावखुरा फलंदाज डी सिल्वा स्ट्राईक घेण्यासाठी पोहोचला.
डी सिल्वा स्ट्राईकवर येताच. त्याने उजव्या हाताचा ऑफस्पिनर मेहदी हसनकडे चेंडू सोपवला. यानंतर फॉर्च्युन बरीशालच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा आपली बाजू बदलली. हे घडताना पाहून रंगपूरने पुन्हा एकदा रकीबुलकडे चेंडू सोपवला. हा सर्व प्रकार पाहून शाकिबला स्वत:वर नियंत्रण ठेवता आले नाही आणि बाऊंड्री लाईनच्या बाहेरून तो फलंदाजांशी बोलू लागला. आणि राग अनावर झाल्याने तो स्वतः चप्पल घालून मैदानात चालत पोहोचला.
यावेळी प्रथम तो त्याच्या फलंदाजांशी बोलत होता त्याच दरम्यान पंचांनी शाकिबला मैदान सोडण्यास सांगितले, यावर शाकिबने पंचांनाच सुंवायला सुरुवात केली. यानंतर प्रकरण शांत झाल्यावर शाकिब स्वतः मैदानाबाहेर गेला.
Typical #ShakibAlHasan, he is not happy, and making his point clear. Drama before a ball has been bowled in the 2nd innings between Barishal and Riders.
Watch #BangladeshPremierleague LIVE, only on #FanCode 👉 https://t.co/vLriRGlyZ2@BCBtigers#BPLOnFanCode #ShakibAlHasan pic.twitter.com/nqImQtv3ab
— FanCode (@FanCode) January 10, 2023


























































